सोमेश्वर येथील घटना; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपाच्या रागातून आपल्या आईसह घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर तेलेवाडी येथे घडली. याचा जाब विचारणाऱ्या आई आणि भावाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कांतीनाथ तुळशीराम हरचिकर (29, तेलिवाडी सोमेश्वर) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार त्यांचा सख्खा भाऊ सुहास तुळशीराम हरचिकर (43, रा. तेलीवाडी सोमेश्वर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने सख्खे भाऊ असून ते सामाईक घरात विभक्त आपले पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहे.त्यांची सोमेश्वर परिसरात वडीलोपार्जित सामाईक राहते घर, शेत जमीनी, आंबा बाग असून सदर मालमत्तेचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यावरुन त्यांचेत वाद चालू आहेत.
२३ जून २०२० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तेलीवाडी, ता.जि.रत्नागिरी येथे फिर्यादीचे राहते घराचे खोलीत त्याची आई श सुनिता तुळशीराम हरचिरकर (वय .७०) ही खोलीचा दरवाजा बंद करुन आत एकटीच असताना फिर्यादीचा यांचा मोठा भाऊ यातील आरोपी सुहास तुळशीराम हरचिरकर याने सामाईक मालमत्तेच्या वाटपावरुन मनात राग धरुन फिर्यादीची आई सुनिता हिला शिवीगाळी करुन धमकी देवून तिला जाळून ठार मारण्याच्या उद्देशान तिला घरासह जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच नंतर सदर बाबत फिर्यादी व आई असे आरोपीकडे विचारणा करणेकरीता गेले असता, आरोपीत याने फिर्यादी व त्याचे आईला धकलाबुकल करुन शिवीगाळी करुन धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.