जेलरोड, नाचणे समर्थनगरसह चार ठिकाणी कंटेन्मेंट झोन 

रत्नागिरी:- बुधवारी निवळी, नाचणे समर्थनगर, जेलरोड परिसर, मौजे कोतवडे धामेळेवाडी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या 42 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 14 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, संगमेश्वर तालुक्यात 1,  दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 7  गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात १ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.