होमक्वारंटाईन असताना घराबाहेर जाऊन सलून व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- होमक्वारंटाईन केलेले असताना घराबाहेर पडून ग्राहकांचे हेअर कटिंग व दाढी करण्याचा प्रताप केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी सदर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामप्रकाश मुन्शीलाल सेन ( वय ५३, रा. झोपडपट्टी मुरुगवाडा- रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी ( ता. २४ ) सकाळी साडेनऊच्या सुमारास भोळेवाडी- मुरुगवाडा येथे घडला. संशयित रामप्रकाश याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाइन केले होते. असे असताना भोळेवाडी येथील हरिश्चंद्र पानगले यांचे केस कापताना नाभिक समाजाचे अध्यक्ष बावा चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण यांना आढळून आला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पालांडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कदम करत आहेत.