मच्छिमार्केट, ओसवाल नगर, निरुळ, गोळप परिसर कोरोना बाधित क्षेत्र

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील मच्छिमार्केट, ओसवाल नगर, निरुळ आणि गोळप (मुसलमान वाडी) परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे या परिसरामध्ये  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  त्या परिसरामधील भाग कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करण्यात आले आहे. 

यामुळे संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या  लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा उदा. सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. वितरीत करणारे/सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत.