बंदुकीची गोळी सुटली थेट कमरेत घुसली

शिरगाव येथील घटना; पोलिस ठाण्यात गुन्हा

रत्नागिरी:-बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून एक गंभीर जखमी झाला. शहराजवळील शिरगाव येथे काल रात्री ही घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोष नारायण लोंढे (वय 36 रा. तिवंडे वाडी  शिरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. 

शासकीय रुग्णालयात त्याच्यावर  शस्त्रक्रिया सुरू आहे. गोळीतील छररे त्याच्या कमरेला व खांद्याला लागली आहे   या बाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. शेजारी उभा असलेला संतोष याला ही गोळी लागली आहे बंदुकीचे मालक संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  बंदुक साफ करत होते. बंदुकीत बुलेट अडकली म्हणून साफ करत असताना अचानक बंदूकीचा ट्रीगर दाबला गेला आणि त्यातील गोळी समोर भिंतीवर आपटुन तिचे दोन तुकडे झाले. त्यातला एक तुकडा संतोषच्या खांद्यावरून गेला तर दुसरा त्याच्या कमरेच्या येथे लागलेला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.