पोलीस कर्मचारी, नर्स आणि आशा सेविका कोरोनाच्या विळख्यात 

रत्नागिरी:- सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात आता पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयातील एका नर्ससह साखरतर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा बजावणाऱ्या एका आशा कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका पोलीस कर्मचारी देखील कोरोना बाधित सापडला आहे.
 

मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत पाच नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये एक पोलीस कर्मचारी, एक नर्स आणि एक आशा सेविका आहे. या सर्वाना कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या पिझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.