दिलासा; जयगडमधील त्या 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जयगड मध्ये दाखल झालेल्या जहाजवरील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच जहाजवरील अन्य साथीदारांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचे अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले असून जहाजवरील 17 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 

जहाज नादुरुस्त झाल्याने पाचजण एका हॉटेलमध्ये थांबले होते. क्वारंटाईन वेळेत हे पाचजण गणपतीपुळेत फिरल्याने मोठी समस्या निर्माण झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये जहाजावर असलेल्या 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर हॉटेल वरील कर्मचारी, सलून व्यावसायिक आणि अन्य काही जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.