जयगड येथे जहाजातून आलेल्यांपैकी आणखी एक पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जयगड येथील जहाजातून आलेल्यांपैकी आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने आलेला पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल यापूर्वी निगेटिव्ह होता. मात्र हा रुग्ण अन्य चार पॉझिटिव्ह रुग्णांसोबत गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये वास्तव्यास होता.
 

दोनच दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये राहणारे चारजण कोरोना बाधित सापडले होते. पाचपैकी चारजण पॉझिटिव्ह तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. सुरक्षेसाठी या पाचव्या व्यक्तीला रत्नागिरीत आयटीआय येथे क्वारंटाईन करून त्याचा स्वॅब नव्याने तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या स्वॅबचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला असून त्या पाचव्या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.