आणखी दोन कोरोना बधितांचा मृत्यू; मृत्यूसंख्या 23 वर

जिल्ह्यात चोवीस तासात नऊ नवे रुग्ण सापडले

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 23 वर पोचली असून मागील चोवीस तासात नऊ नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशे समीप पोचली आहे.
 

सोमवार सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 9 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आडे, ता. दापोली येथील 1, दाभोळ दापोलीतील 2, कडवई संगमेश्वर येथील 1, अंधेरी कारभाटले ता. संगमेश्वर येथील 1, तिवरेवाडी संगमेश्वर येथील 1, इसवली ता. लांजा येथील 1, निवळीफाटा हातखंबा रत्नागिरी येथील 1, पश्चिम बंगाल क्वारंटाईन 1 यांचा समावेश आहे.
 

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला.  यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील पुरुष रुग्ण (वय 72) तसेच शिवतर ता. खेड येथील पुरुष रुग्ण (वय 44) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला.  दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
 

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 493 आहेत. यापैकी बरे झालेले रुग्ण 358, मृत्यू-23 एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-113 (यामध्ये 01 रुग्ण पुन्हा दाखल) आहे.