बार्जसाठी धोक्याची घंटा; अजस्त्र लाटांनी दोर तुटला

रत्नागिरी:-मिऱ्या बंधाऱ्यावर येऊन धडकलेल्या बार्जसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रविवारी समुद्राला आलेल्या अमावस्येच्या भरतीने बार्जचे मोठे नुकसान केले. अजस्र लाटांनी बार्जच्या बचावासाठी लावलेला दोर तुटला. दोर तुटल्याने बार्ज लाटांच्या माऱ्याने बंधाऱ्यावर धडकत होते. बार्ज बंधाऱ्यावर धडकत असल्याने डिझेल गळतीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
 

भगवती बंदर येथून भरकटलेले बार्ज मिऱ्या किनाऱ्यावर येऊन थांबले आहे. पंधरा दिवसापासून बार्ज किनाऱ्यावरच आहे. बार्जमध्ये मोठा डिझेल साठा आहे. रविवारी समुद्राला आलेल्या अमावस्येच्या भरतीने बार्जचे नुकसान केले. बार्जचा मागील बाजूचा दोर लाटांच्या माऱ्याने तुटला. यामुळे लाटांच्या तडाख्यात बार्ज सापडले. अजस्त्र लाटांमुळे बार्ज बंधाऱ्यावरील खडकांवर आदळत होते. यात बार्जचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.