रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय असताना कोरोनाने आणखी दोन बळी घेतले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 19 वर पोचली आहे. शनिवार सायंकाळपासून प्राप्त अहवालात 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 484 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये काडवली, संगमेश्वर येथे 2, गोळप रत्नागिरी येथे 1, शहरातील ओसवालनगर येथे 1, गणपतीपुळे येथे 1, निवळी चिपळूण येथे 1, साळवीवाडी असुर्डे 1, खांदाटपाली चिपळूण येथे 1 रुग्ण सापडला आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यु झाला. यामध्ये कापडगाव येथील पुरुष रुग्णाला(वय 53 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. तर भिले, कुंभारवाडी, ता. चिपळूण येथील महिला रुग्णांलाही (वय 70 वर्षे)मधुमेहाचा आजार होता. त्यांना महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 484 आहेत. 349 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, 19 जणांचा मृत्यू तर 116 रुग्ण उपचार घेत आहेत.