रत्नागिरी:- सहकारी विकास सोसायट्यांच्या माध्यमातून गावागावात खतांची विक्री केली जाते; परंतु कृषी अभ्यासक्रमातील पदवी किंवा डिप्लोमा अत्यावश्यक केल्यामुळे यंदा रत्नागिरी तालुक्यातील सुमारे बारा सोसायटींचे प्रस्ताव रखडले आहेत.
कृषी विभागाकडून सहकारी विकास सोसासटींना परवानग्या दिल्या जातात; परंतु यंदा ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे संबंधित सोसायटींकडून आलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. यामध्ये कृषी अभ्यासक्रमातील डिग्री किंवा डिप्लोमा करणे अत्यावश्यक केले आहे. ही अट 2017 पासून लागू करण्यात आली आहेत. यंदा त्याची कसून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील बारा प्रस्ताव कृषी विभागाकडे पडून होते. त्या सोसायसटींमाफत खते, बियाणे पुरवठा करणे अशक्य होते. आधीच कोरोनामुळे शेतकर्यांना तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य होत नव्हते. या परिस्थितीत शेतकर्यांची गैरसोय होत होती. आधीच खताचा तुटवडा असताना सोसायटींना खते विक्री करण्यास परवानगी नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. यावर कृषी विभागाकडून पर्याय काढण्यात आला आहे.
चौकट
सोसायटींना परवानगी देण्यातील त्रृटी दूर केल्या आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही पदवीधरांची कागदपत्रे जोडून दिलेली आहेत. ते प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.- व्ही. एम. हेगडे, तालुका कृषी अधिकारी