रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल सायंकाळपासून 11 रुग्ण आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.नव्याने आढळलेल्या 11 रुग्णांमध्ये साडवली संगमेश्वर 3, उत्तर प्रदेश 3, विद्यानगर कराड 1, कर्टेल, ता.खेड 3 येथील रुग्णांचा समावेश आहे.तर एका रुग्णाची माहिती अप्राप्त आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सरासरीपेक्षा चांगले आहे. आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या 343 आहे तर 17 जणांना मृत्यू झाला आहे. उपचार घेणारे कोरोना बाधित अॅक्टिव्ह रुग्ण 116 आहेत.