राहुल गांधी यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमानी साजरा

रत्नागिरी:- अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज अतिशय साध्या पण समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस भवन येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद उपळेकर यांचे पिता दिवंगत चंद्रकांत वामन उपळेकर यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शना नुसार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा, तालुका व व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये गरीब मुलांना दुधाचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर कोरोना वर मात करण्याकरिता आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेस मास्क व फेस शील्ड चे वाटप करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या विधान परिषद आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या आमदार निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता फेस शील्ड व फेस मास्क तालुका आरोग्य अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा मयेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, पक्षाचे नेते रमेश शाह, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, ईम्तियाज मुजावर, दिपक राउत, भाग्येश मयेकर, रवि खेडेकर, अशफाक काद्री, ईम्तियाज डिंगीकर, कपिल नागवेकर, शब्बीर भाटकर, चेतन नवरंगे, सचिन मालवणकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते