रत्नागिरी:- जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 17 जूनला जयगड येथे ओएनजीसीच्या शिप मधून आलेल्या पाच पैकी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मुंबईतून सुटलेली ही शिप 17 जूनला सकाळी 10 वाजता जयगड येथे दाखल झाली होती. या शीप मधून पाच कामगार रत्नागिरीत दाखल झाले होते. या पाचही जणांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. या पाचही जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला असून पाचपैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. चारही जणांना शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.