रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 360 कोटींचा निधी मंजूर

ना. उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांकरिता 360 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. निसर्ग चक्रीवादळात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे नुकसान झालेली आहे यामुळे कोकण आयुक्त यांनी शासनाकडे 360 कोटी रुपये निधीची मागणी केली होती, ती मागणी बुधवारी मुख्यमंत्री यांच्यासमवेत आपल्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. शिवाय हा निधी बुधवारी रात्रीपर्यंत किंवा गुरुवारी दुपारपर्यंत वर्ग होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. जे कुटुंब या चक्रीवादळात बाधित आहेत त्यांच्या बँक खात्यामार्फत ही मदत पोहोच केली जाणार आहे.
 

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात 93 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत शिवाय मदतीचे वाटप देखील सुरू आहे जिल्ह्यामध्ये 794 गावे बाधित झालेली आहेत मात्र जीवित हानी झालेली नाही जिल्ह्यामध्ये 1770 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून 41 हजार 306 अंशतः बाधित झालेली आहे यात मंडणगड मध्ये 600, दापोलीमध्ये 896, गुहागरमध्ये  4, रत्नागिरी तालुक्यात अकरा व इतर ठिकाणी देखील घरांची पूर्णपणे हानी झालेली आहे. तर अंशतः नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये मंडणगड मध्ये 14000 दापोली मध्ये 22000 गुहागर मध्ये 1745 रत्नागिरी तालुक्यामध्ये 1120 व इतर तालुक्यांमध्ये देखील घरांचे अंशतः नुकसान झालेले आहे तर जिल्ह्यांमध्ये 1871 गोठे 756 दुकाने बाधित झाली असून 94 जनावरे दगावली आहेत आज पर्यंत 8 कोटी 9 लाख मदतीचे वाटप करण्यात आलेली आहे यापैकी बँकेच्या खात्यात 7 कोटी 88 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
 

या चक्रीवादळात नुकसान झालेल्या झाडांची झाडे निहाय नुकसान भरपाईची मागणी आपण केलेली आहे कृषी विभागाकडे आठ कोटी चा निधी प्राप्त झाला आहे तर दुकानात करिता 75 लाख 25 हजारांचा निधी प्राप्त झालेला आहे बागांच्या साफसफाईसाठी 1992 ची रोजगार हमी योजना राबवण्याची मागणी आपण केली आहे ही देखील आजच्या व्हीसीत मान्य झालेली आहे. 

अंशतः घरांसाठी पंधरा हजार रुपये अधिक दहा हजार रुपये असे पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी देखील मान्य झालेली आहे घरांचे 25% नुकसान झालेले आहे त्यांना पंधरा हजार रुपये, 25 टक्के ते 50 टक्के घरांचे नुकसान झालेले आहे त्यांना पंचवीस हजार रुपये, पन्नास टक्क्यापेक्षा अधिक यांच्या घराचे नुकसान झालेले आहे त्यांना पन्नास हजार रुपये व ज्यांची घरे पूर्णपणे पडलेली आहेत अशांना एक लाख 50 हजार रुपये देण्याचे देखील मुख्यमंत्री यांनी मान्य केले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच रोजगार हमी योजना लागू करून पावसाळा असल्याने घरांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे यावेळी बोलताना म्हणाले.

मत्स्य उद्योगाबद्दल बोलताना ते म्हणाले की ज्यांचे अंशतः नुकसान होते अशांना चार हजार 100, पूर्णतः नुकसान होते अशांना 9 हजार 600, ज्यांची अंशतः जाळी फाटलेली आहे अशांना दोन हजार शंभर, पूर्ण झालेली जाळी फाटलेली आहेत अशांना 2 हजार 600 रुपये देण्याची पूर्वीची पद्धत होती. मात्र आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात सरसकट अडीच पट वाढ केली असल्याचे देखील यावेळी बोलताना म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची आपण बोललेलो असून मुंबई विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून चक्रीवादळ ग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय देखील झालेला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
 

आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांवरील पत्रे उडून गेलेले आहेत. अशांना देखील सरकार मदत करणार असल्याची माहिती. याकरिता 24 कोटी रुपये 3 जिल्ह्यांकरिता गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 
 सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती सांगताना ते म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40 गावे या वादळात बाधित झालेली आहेत. प्रशासनाने वेळीच काळजी घेतल्याने जीवितहानी झालेली नाही. दोन घरे पूर्णपणे पडलेली आहेत. 47 घरांचे अंशत नुकसान झालेले आहे. 3 गोठे व एका दुकानाची आणि झालेली आहे. कृषी खात्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. 37 लाखांचा निधी प्राप्त झालेला असून त्याचे वाटप देखील करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिली.
 

दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाबाबत बोलताना ते म्हणाले की या पथकाचे अध्यक्ष यांना केवळ कोकण हा भाग महत्त्वाचा नसून संपूर्ण देश महत्त्वाचा वाटत असल्याने ते फार घाईत होते शिवाय दापोलीमध्ये आज कनेक्टिविटीची अडचण असल्याने ते तातडीने महाडला रवाना झाले. मात्र त्यांनी आपल्याशी या झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन मिनिटे वेळ दिला. मात्र त्यांच्याबरोबर आलेले अधिकाऱ्यांचे पथक हे फार फार चक्रीवादळ ग्रस्तांसाठी पॉझिटिव्ह असल्याचे यावेळी बोलताना म्हणाले. ते म्हणाले की दापोलीमध्ये आल्यानंतर पथक पुढे सरकत गेले. लोकांना त्यांना भेटायचे होते. आपली व्यथा मांडायची होती मात्र पथकाने ती नाकारली. या पथकाने दापोलीमध्ये वेळेत येऊन देखील दोन गावांना गावांच्या भेटी देखील रद्द केल्या ह्या रद्द का केल्या हे देखील अनाकलनीय असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. मात्र इतर सदस्यांशी चर्चा केल्यानंतर याकरिता आपल्याला पुन्हा कोकणात यावे लागले तरी आपण येऊन व कोकणवासीयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन या पथकाने आपल्याला दिलेले असल्याचे देखील यावेळी बोलताना म्हणाले.
 राज्य शासन हे चक्रीवादळ त्यांच्या पाठीशी उभे आहे हे आज मुख्यमंत्र्यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सिद्ध केलेले आहे केंद्राने देखील राज्य शासनाने प्रमाणे चक्रीवादळ ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहावे व कोकणाला अधिकाधिक भरीव मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.