फसवणूक करणाऱ्या टोळीतील सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी:- तुमच्या मुलाला बांधकाम खात्यात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणातील सहा संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे.
 

साईप्रसाद विलणकर (वय २७), वैशाली दरडे उर्फ नेहा आखाडे (३८, दोघे रा. खडपेवठार, रत्नागिरी), साईराज मोरे (२६, शिरगाव, रत्नागिरी), अनीफ झारी (कोकणनगर), धीरज खलसे (२३, रत्नागिरी) आणि ओमकार तोडणकर (पेठकिल्ला, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे असून यांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. पूजा विलणकर (रा. खडपेवठार) आणि आशिष पाथरे (रा. साडवली, देवरूख) हे दोघ अद्याप फरार असून ग्रामीण पोलिस कसून शोध घेत आहेत. संशयितांच्या विरुद्ध शंकर नारायण लिंगायत (वय ६७, रा. पानवल-रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि. १७) पुन्हा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ केली आहे.