जिल्ह्यात आज आणखी 10 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 459

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कळंबणी 5, रत्नागिरी 2, गुहागर 1 आणि देवरुखमधील 2 जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 459 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने उपचारात असणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 108 आहे. त्यापैकी 104 जणांना रुग्णालयात उपचार घेत आहेत.