कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र घोषित

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या परिसरामधील भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र जाहिर करण्यात आला. 
 

रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर गावातील हद्दीमधील आजूबाजूच्या  परिसर यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदर क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या  लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. वितरीत करणारे/सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत.               

विस्थापित मजूर, पर्यटक, विद्याथी, यात्रेकरु व इतर व्यक्ती यांना स्थलांतरणास परवानगी दिली असली तरी Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) मधून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही.