रत्नागिरी:- मंगळवार सायंकाळपासून 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार नवे रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या 449 वर पोचली आहे. नव्याने सापडलेले चार रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2, दापोली 1 आणि देवरुख 1 रुग्ण आहे. तसेच कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथून घरी सोडण्यात आले.
सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 449 असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 325 आहे. 17 जणांचा मृत्यू झाला असून अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 106 आहेत.