रत्नागिरी:- जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल सादर करणार आहे.
या दौऱ्यामध्ये केंद्रीय पथकाचे प्रमुख श्री. रमेश कुमार गांता (भाप्रसे), सहसचिव,(ॲडमिनीस्ट्रशन आणि सीबीटी) एनडीएमए, एमएचए, नवी दिल्ली हे असणार आहेत. त्यांच्यासोबत श्री.आर.बी. कौल,सल्लागार, वित्त मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली, श्री. एन.आर.एल.के. प्रसाद,संचालक, ऊर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली, श्री.एस.एस.मोदी, उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली, श्री. आर.पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, श्री. आंशुमली श्रीवास्तव, मुख्य अभियंता, विभागीय कार्यालय, रस्ता वाहतूक मार्ग विभाग, मुंबई हे पथकात असणार आहेत.
हे पथक बुधवार 17 जुन 2020 रोजी 10.00 वाजता मंडणगड येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता आंबडवे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.00 वाजता शिगवण येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.55 वाजता केळशी येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 12.30 वाजता आडे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 01.10 वाजता पाजपंढारी येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 01.50 वाजता दापोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.50 वाजता दापोली येथून मुरुड, दापोली कडे प्रयाण. दुपारी 03.05 वाजता मुरुड येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 03.35 वाजता कर्दे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सायंकाळी 04.30 दापोली येथे आगमन व जिल्हाधिकारी यांचे सादरीकरण. दापोली येथे राखीव व मुक्काम असणार आहे.