जमिनदोस्त 8 हजारांपैकी 4 हजार खांब उभे

महावितरणची कसरत; 81 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात वीजपुरवठा खंडित झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 81 टक्केपेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त भागात वीज खंडित झालेल्या 4 लाख 14 हजार 694 पैकी 3 लाख 60 हजार 222 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. 8 हजार विद्युत खांब जमिनदोस्त झाले होते. बाधित 623 पैकी 438 गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.  

जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागात वीज खंडित झालेल्या 4 लाख 14 हजार 694 पैकी 3 लाख 60 हजार 222 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. बाधित सर्वच 47 उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. 188 फिडरपैकी 175 फिडर पूर्ववत करण्यात आले आहेत. 5 हजार 691 रोहित्रांपैकी 4 हजार 845 रोहित्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. उच्चदाबाचे 3 हजार तर लघुदाब वाहिनीचे 5 हजार खांब जमीनदोस्त झाले होते. त्यातील उच्चदाबाचे 1 हजार 336 व लघुदाबाचे 2 हजार 697 विजेचे खांब पुन्हा उभारण्यात आले आहेत. बाधित 623 पैकी 438 गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलाआहे.

वीजपुरवठा बाधित झालेल्या भागातील 81 टक्केपेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मान्सूनच्या पावसाचा अडथळा लक्षात घेऊन या कामांना आणखी गती देत उर्वरित भागाचा वीजपुरवठा लवकर सुरु करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.