आणखी 14 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 445

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे स्वॅब तपासणीस आलेल्या 14 रुग्णांचे अहवाल काल संध्याकाळ पासून पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 445 झाली. तर कालपासून बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 3 आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 308 झाली आहे.

काल संध्याकाळ पासून पॉझिटिव्ह आलेल्यांचे विवरण रत्नागिरी 3, दापोली 3 आणि कामथे 8 सर्व एकूण 14 असे आहे. 24 तासात बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय 2, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 1 असे एकूण 3 आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 308 आहे तर आतापर्यंत 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. उपचारात असणार्‍या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 120 आहे.