कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्क्यांवर

रत्नागिरी:- सोमवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 आहे. दिवसभरात 4 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी वाढून 70 टक्के झाली आहे.  

जिल्ह्यात आत्तापर्यंत 17 जणांचे कोरोनाने मृत्यू झालले असून आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 109 इतकी आहे. दिवसभरात कोव्हीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन येथील 3 आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथील एका रुग्णाला उपचाराअंती घरी सोडण्यात आले. दिवसभरात केवळ 13 पॉझिटीव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढून 431 झाली आहे. यापैकी 305 जण कोरोनामुक्त तर 109 जण उपचाराखाली आहेत. 
 

जिल्ह्यात सध्या 30 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 3 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 1, खेड तालुक्यात 04 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 2, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 1, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये, राजापूर तालुक्यात 6 आणि मंडणगड मधील 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.    

संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यामध्ये शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी 20, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण भवन रत्नागिरी 2, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल खेड 2,  कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 7, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर 3 असे एकूण 37 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.   

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 51 हजार 355   इतकी आहे. आत्तापर्यंत 6 हजार 6836 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 624 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 288  तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 431 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 6 हजार 836 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.