रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून आणखी 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालानंतर आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 झाली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज दहा पेक्षा अधिक पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. चारशेचा आकडा ओलांडल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने पाचशेकडे झेपावत आहेत. दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 9 रुग्ण कळंबणीतील असून तीन रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर एक रुग्ण देवरूख येथील आहे. दरम्यान काल सायंकाळपासून येथील समाज कल्याण सीसीसी मधून दहा रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 301 इतकी झाली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 431 कोरोना बाधितांची संख्या पोचली आहे. 301 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला असून 113 जण उपचारखाली आहेत.