रत्नागिरी:-मी अक्सिस बँकेतून बोलतोय अशी बतावणी करत एका भामट्याने चक्क पोलिसालाच ५४ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम मारूती पाटील (वय -40 व्यवसाय- नोकरी पोलीस मुख्यालय रत्नागिरी रा . सन्मित्रनगर रत्नागिरी) यांच्या मोबाईल २ जून रोजी एक कॉल आला होता. मी अक्सिस बँकेतून राजवीर सिंग बोलत आहे.तुम्हाला ऑफर आली आहे. तुम्हाला नवीन क्रेडीट कार्ड मिळाले असून तुमच्या क्रेडीट कार्डवरचे शेवटचे चार नबर तुम्ही मला सांगा.यावेळी पाटील यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर सांगून स्वतःच्या क्रेडीट कार्डवरील शेवटचे चार नंबर त्या भामट्याला सांगितले.
त्यानंतर पाटील यांच्या मोबाईलवर दुसरा ओटीपी आला..तो नबर हि पाटील यांनी त्याला सांगितला. हा नंबर सांगताच पाटील यांच्या बँक खात्यातून २० हजार रुपयांचे ट्रॉझेक्शन झाले त्यानंतर पुन्हा कॉल कृउन तुम्हाला ११ हजार रुपयांची ऑफर आली आहे. तुम्ही पुन्हा आलेला ओटीपी नंबर सांगा. त्यानुसार नंबर सांगताच पाटील यांच्या खात्यातून ५ हजार रुपये डेबिट झाले. चौथ्या ओटीपी वेळी 3,500 रूपये व सलग दोन ओटीपी आल्यावर त्यांच्या खात्यातून 1,500, व 4,500रूपये असे सलग दोन वेळा डेबीट झाले. त्यानंतर पाटील यांनी दुसऱ्या दिवशी थेट आपली बँक गाठली. त्यावेळी खात्यातून ५४ हजार ५०० ट्रान्सफर झाल्याचे त्यांना समजले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजाराम मारुती पाटील यांनी शनिवारी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तोतया बँक कर्मचाऱ्या विरुद्ध भा.द.वी.क.४२०,४०३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.