रत्नागिरी:- रत्नागिरी येथे स्वॅब तपासणीस आलेल्या 8 रुग्णांचे अहवाल दिवसभरात पॉझिटिव्ह आले त्यामुळे शनिवारपासून पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या 16 झाली तर एकूण संख्या 418 झाली आहे. कालपासून बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 12 आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 291 झाली. एका 67 वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 17 झाली आहे.
24 तासात पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 10, संगमेश्वर 2, कळंबणी 2, राजापूर 1 आणि कामथे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 24 तासात बरे झालेल्या रुग्णांमध्ये सीसीसी पेढांबे येथील 5, जिल्हा रुग्णालय 1, वेळणेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा लोटे 2 आणि कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
मुंबई येथून आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील निकूरवाडी येथील एका रुग्णाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. या 67 वर्षीय रुग्णास उच्च रक्तदाब व मधुमेह देखील होता. या वृद्धाच्या मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 इतकी झाली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 418 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 110 असून यापैकी 100 जण रुग्णालयात दाखल आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 06 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 08 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.