रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळनंतर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 410 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2, संगमेश्वर 2, कळंबणी 2, राजापूर 1 आणि कामथे येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथून 1 आणि पेढांबे येथून 1 अशा 2 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 281 झाली आहे. सद्यस्थितीत एकूण 410 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. यापैकी 281 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत 16 बळी घेतले आहेत. अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 113 असून 110 रुग्ण रुग्णालयात आहेत.