रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात काल सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.

नैऋत्य मोसमी पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलिमीटर नोंदला गेला. त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणे आहे.
मंडणगड 12 दापोली 33 खेड 9 गुहागर 58 चिपळून 33 संगमेश्वर 28 रत्नागिरी 237 लांजा 59 आणि राजापूर 160