रत्नागिरीसह प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे मुंबई, पुण्यातून अनेकांनी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. मात्र, रत्नागिरी तसेच इतर नॉन रेड झोन जिल्ह्यात एकही कोरोना स्वॅब लॅब नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका स्थानिक मच्छिमार खलील अहमद हसनमिया वास्ता यांनी अॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत दाखल केली होती.

त्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाल्यानंतर मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठ राखून ठेवलेला निर्णय दिला. न्यायालयाने यायचीकेची दाखल घेतां राज्यातील जनतेनेही राज्य सरकारच्या मार्गदर्शन तत्त्वांचे काटेकोर पणे अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट करत याचिका निकाली काढली.