दिवसभरात 19 तर आतापर्यंत 279 जण कोरोनामुक्त
रत्नागिरी :–आज दिवसभरात 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 279 इतकी झाली आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरीपेक्षा चांगले असल्याने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. संध्याकाळपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 402 असून यात 16 मृत्यू झालेले आहेत. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 106 इतकी आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये सावर्डे कोव्हीड केअर सेंटर येथून 7, समाजकल्याण, रत्नागिरी येथून 6 , जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीतून 1, कोव्हीड केअर सेंटर के.के.व्ही, दापोली येथून 3आणि साडवली येथून 2 रुग्णांचा समावेश आहे.. आज पॉझिटिव्ह आलेल्या 10 अहवालातील 5 रत्नागिरीतील असून 1 रुग्ण कामथे येथील, दापोली येथील 2 आणि संगमेश्वर येथील 2 रुग्णांचा समावेश आहेत. यातील दापोली येथे एक रुग्ण 11 तारखेला दाखल करण्यासाठी आणला असता तो मरण पावला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झालेली आहे.
जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 06 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 08 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी- 28, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी- 4, उपजिल्हा रुग्णालय कामथे- 1, उपजिल्हा रुग्णालय कळबणी-1, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड- 2, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली- 10, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर-3 असे एकूण 50 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज
होम क्वारंटाईनची संख्या 948 ने वाढली असून
52 हजार 831 इतकी आहे.
आत्तापर्यंत 6 हजार 600 अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 362 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 25 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 402 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 601 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 337 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 337 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 217 अहवाल मिरज आणि 116 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.