रत्नागिरी:- शुक्रवार सायंकाळपासून आलेल्या अहवालांपैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 402 झाली आहे. दापोलीत एका कोरोना बधिताचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू संख्या 16 झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 5 रत्नागिरीतील असून कामथे येथील 1 दापोली येथील 2 आणि संगमेश्वर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. यातील दापोली येथील एक रुग्ण अकरा तारखेला दाखल करण्यासाठी आणला असता तो मरण पावला होता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झालेली आहे. दरम्यान सात रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 267 झाली आहे.
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 402 असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 267 तर आतापर्यंत मृत्यू 16 झाले आहेत. एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 118 आहे.