रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपासून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 18 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 12 तासात 18 अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 390 झाली आहे. नव्याने सापडलेल्या 18 रुग्णांपैकी सर्वाधिक 12 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत तर 6 रुग्ण कळंबणी येथील आहेत.
दरम्यान रत्नागिरी येथील 1 आणि कोव्हीड केअर सेंटर घरडा (लोटे) येथील 3 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 248 झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह 390, बरे झालेले 248, मृत्यू 15 तर एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 127 आहेत.