रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासाच्या पावसात रत्नागिरी शहरात पाणी साचले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली.
गुरुवारी दुपारनंतर मान्सून जिल्ह्यात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पावसाला सुरुवात झाल्यापासून तो ठराविक काळाने सरीवर सरी होवून कोसळत आहे. शुक्रवारी दिवसभर अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली. सायंकाळनंतर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरात गोखले नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.