225 जणांची कोरोनावर यशस्वी मात

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्याचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी सायंकाळ पासून 2 जण कोरोनाबाधित सापडले आहेत तर याच कालावधीत 14 जण बरे झाले आहेत. 

जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून दोन नवे रुग्ण सापडले आहेत. आलेल्या अहवालानुसार संगमेश्वर येथील 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 372 वर पोचली आहे. आतापर्यंत 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून उपचाराखाली 130 रुग्ण आहेत. बुधवार पासून 14 रुग्णांना बरे झाल्यावर घरी जाऊ देण्यात आले आहे. आतापर्यंत 225 जणांनी कोरोनावर मात केली आहे.