सॅन्ट्रोच्या धडकेत वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील पानवल फाटा येथे दुचाकीला सॅन्ट्रो कारने विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली. दुचाकीवरील चालक राजाराम लक्ष्मण साळुंखे (वय ७२) रा. चाफवली संगमेश्वर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जखमी दुचाकीस्वार राजाराम लक्ष्मण साळुंखे हे पानवल येथून चाफवली येथील आपल्या गावी जात होते. गावातून ते पानवल फाट्यावर आले असता विरुद्ध दिशेने आलेल्या सॅन्ट्रो चालक सुधाकर श्रीधर सावंत (रा. कुवारबाव) याने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील सखाराम साळुंखे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात हलविले.         

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम, हेड कॉन्स्टेबल श्री. झगडे यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. जखमी राजाराम साळुंखे यांची प्रकृती स्थिर असून सेंट्रो चालक सुधाकर सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.