रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 15 वर पोचली आहे. नव्याने एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला असून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या 368 वर पोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज भर पडत आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब असली तर फार कमी प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत.
बुधवारी नव्याने एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढून 368 इतकी झाली आहे. तर कोरोनाने जिल्ह्यात आणखी एक बळी घेतला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 15 वर पोचली आहे.
कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 203 जणांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 150 जण उपचारखाली असून आतापर्यंत 6 हजार 203 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.