आज नव्याने 3 कोरोना बाधित;एकूण रुग्णसंख्या 367 वर
रत्नागिरी:- सतत कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांपेक्षा जास्त असून आज 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 195 झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी 3 नवीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटीव्ह असून 39 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 367 झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 158 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 14 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आलेल्या रुग्णांचे विवरण जिल्हा शासकीय रुग्णालय 1, संगमेश्वर 4, कोव्हीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन 3, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल खेड 3 असे आहे.