आत्तापर्यंत 6 हजार 162 अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 890 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 464 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 364 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 6 हजार 162 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 341 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 341 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 337 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 1 लाख 23 हजार 575 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 53  हजार 210 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्हयात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे.मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणारांची संख्या 62 हजार 95   इतकी आहे.