जिल्ह्यात 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी:- जिल्ह्यात 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन आहेत. रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 8 गावांमध्ये, खेड तालुक्यात 16 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 23 गावांमध्ये,  मंडणगड तालुक्यामध्ये 2 गावामंध्ये, दापोली मध्ये 16 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 8 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 17  गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 11 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन आहेत.

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून   आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. जिल्ह्यात होम क्वारंटाईन खाली असणारांची संख्या 62 हजार 721  इतकी आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 890 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 464 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 361 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 6 हजार 94 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 426 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.