जिल्ह्यात कोरोनाचा 14 वा बळी; आणखी तीनजणांना कोरोना, रुग्णसंख्या 364 वर

रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून कोरोनाचे 49 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये आणखी तीनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तब्बल 46 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 3 जून रोजी मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या चौदावर पोचली आहे. 
 

नव्याने 49 अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमध्ये 3 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 46 अहवाल निगेटिव्ह आहे. यात  3 जुन रोजी कामथे येथे मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल यात प्राप्त झाल्याने मृत्यूची संख्या 14 झाली. सोमवारी प्राप्त इतर दोन पॉझिटिव्ह अहवाल रत्नागिरी 1 आणि संगमेश्वर 1 असे पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर 6 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 
 

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 364 सापडले आहेत. तर उपचारांती एकूण बरे झालेले रुग्ण 173 आहेत. कोरोनाने आतापर्यंत 14 बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत 177 रुग्ण उपचाराखाली आहेत.