देवाचेगोठणे येथील अपघातात एकाचा मृत्यू

राजापूर:– तालुक्यातील देवाचेगोठणे (पारवाडी) येथे झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.शनिवारी (ता.6 जून ) संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पारवाडी पुलाजवळ हा अपघात झाला होता.

संदेश राजाराम गावडे, विशाल दत्ताराम गावडे हे दोघे नाटे येथून देवाचे गोठणे येथील आपल्या उंबरवाडीतील घरी दुचाकीवरुन येत होते. यावेळी पारवाडी येथे दुचाकी घसरुन खोल दरीत कोसळली. यामध्ये विशाल गावडे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला राजापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राजापूरातून विशाल गावडे यास शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले होते.परंतु आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान विशाल दत्ताराम गावडे मयत पावला आहे.या घटनेमुळे देवाचेगोठणे परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे.