ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

रत्नागिरी:-तालुक्यातील ओरी-सात पायरी येथे ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.हा अपघात ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.याप्रकरणी ट्रक चालक विरुद्ध ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू नारायण मांडवकर (वय-४०,रा.चाफे) हा तरुण शुक्रवारी रात्री दुचाकीवरून निघाला होता. ओरी-सात पायरी येथे दुचाकी व ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार राजू मांडवकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यातच त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी राजु याचा चुलत भाऊ चंद्रकांत महादेव मांडवकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालक मुळकसाहब सरदार तासेवली (वय-३९,रा.मलकापूर याच्या विरुद्ध भा.द.वी.क ३०४ (अ),२७९,३३७,३३८,मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेडगे करीत आहेत.