जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 361 वर

रत्नागिरी:- मागील चोवीस तासात प्राप्त अहवालांमध्ये 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये सकाळी प्राप्त झालेल्या 12 अहवालांचा समावेश आहे. तसेच 79 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 361 झाली आहे. 

चोवीस तासात सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये संगमेश्वर 9, राजापूर 2, कामथे 6 आणि रत्नागिरीतील एका रुग्णाचा समावेश आहे. रविवारी दिवसभरात 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 167  रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 13  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर  अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 181 आहे.