रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता शासनाने नवा आदेश काढला आहे. लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरी विलगीकरण करुन तेथेच उपचार केले जाणार आहेत. तसे आदेश राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिले आहेत. घरी उपचार होणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असून त्यांना घरा बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हा शासकिय रुग्णालयाला प्राप्त झाले आहे.
सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचाराबाबत काढलेल्या आदेशा आधार राज्य सरकारने नवे आदेश सर्व जिल्हा रुग्णांलयांना दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांची वर्गवारी केली जाणार आहे. लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे, अतिसौम्य लक्षणे, मध्य लक्षणे, तीव्र लक्षणे असे वर्गिकरण होणार आहे. अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा असणं आवश्यक असून त्यांची संमत्ती असणे हि बंधनकारक आहे.