आणखी 12 कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या साडेतीनशेपार

रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळपासून 31 जणांचे अहवाल  प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांमध्ये 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 19 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

शनिवारी दिवसभर दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नवीन अहवाल प्राप्त झाल्याने आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 355 झाली आहे

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये संगमेश्वर मधील 9, राजापूर 2 आणि कामथे येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.