दिलासादायक..जिल्ह्यात दिवसभरात 30 जण कोरोनामुक्त

नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

रत्नागिरी:– जिल्ह्यात दिवसभरात 30 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 159 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज प्राप्त झालेले 43 अहवाल निगेटिव्ह असून आज नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आतापर्यंत एकूण 343 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत त्यापैकी तर 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 171 आहे.

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 43, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 10, उपजिल्हा रुग्णालय कामथे – 4, उपजिल्हा रुग्णालय कळबणी -2, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 5, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 2, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर – 1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 4 असे एकूण 71 कोरोना संशयित दाखल आहेत. मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज रोज होम क्वारंटाईन खाली असणार्‍यांची संख्या 62 हजार 588 इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 744 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 372 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 343 अहवाल पॉझिटीव्ह आले असून उर्वरीत 6 हजार 11 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 372 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 372 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 368 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 05 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 20 हजार 83 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 48 हजार 830 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 22 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.