रत्नागिरी:- जिल्ह्यात 76 गावातील 151 वाड्यांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यातील ही परिस्थिती आहे. निसर्ग चक्रीचादळामुळे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे टँकरचे प्रमाण कमी होईल अशी आशा जिल्हा परिषद प्रशासनाने बाळगली आहे.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत उन्हाचा तडाखा सुरुच होता. पारा 36 अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला होता. उष्मा वाढल्यामुळे टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये भर पडेल अशी शक्यता वर्तविली जात होती. सर्वाधिक पाणी टंचाई खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये जाणवत होती. तर रत्नागिरी, गुहागर, राजापूर या तालुक्यातील टंचाईचे योग्य नियोजन करत शेवटपर्यंत टँकरमुक्त राहण्यात यश मिळवले. दोनच दिवसांपुर्वी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात बहूतांश गावांत पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाईची तिव्रता पुढील दोन दिवसात घट होईल असा अंदाज आहे. मोसमी पावसाचे आगमनही येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची दाट शक्यता आहे.
तालुकानिहाय टंचाईग्रस्त वाड्या खालीलप्रमाणे:-
तालुका गावे वाड्या
* मंडणगड 5 6
* दापोली 9 20
* खेड 20 38
* चिपळूण 15 34
* संगमश्वेर 19 39
* लांजा 8 14