फिनोलेक्स इंडस्ट्रीज सीएसआर भागीदार फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून कोव्हीड – 19 या देशभर पसरलेल्या साथीच्या काळात समाज आणि असुरक्षित मुले आणि महिलांना पाठिंबा देत आहे.
समाजकार्य हे मुख्यस्थानी असलेल्या फ़ाऊंडेशनच्या या कार्यात त्यांची टीम, समर्थक, देणगीदार आणि स्वयंसेवक आणि इतर भागीदार संस्था यांचा फाउंडेशनच्या या कार्याला पाठिंबा होता. जास्त मदतीची गरज लागण्याची संभाव्यता ओळखून फाउंडेशनतर्फ़े मदत करण्यासाठीच्या संधींचा शोध घेण्यात आला.
हे सर्व व्हेंटिलेटर आणि इतर साधनसामग्रीच्या माध्यमातून रुग्णालयांना मदत करण्यापासून सुरू झाले जी काळाची गरज होती. फाउंडेशनने मास्कस, पीपीई सूट, हॅजमॅट सूट ग्लव्ज, सॅनिटायझर्स आणि इतर वैद्यकीय आवश्यक गोष्टी देखील पुरविल्या. आमचे मुख्य योद्धे – डॉक्टर आणि परिचारिकांना घरापासून दूर असताना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक गोष्टींनीयुक्त किट देऊन मदत केली गेली आहे.
दररोज वेतन कामगार, झोपडपट्टीवासीय, स्थलांतर करणारे, भंगार गोळा करणारे यासह 76000 लोकांना कोरड्या किराणा किट देऊन पाठिंबा देण्यात आला आहे. स्वयंसेवक, भागीदार आणि इतर हितचिंतकांनी अगदी प्राथमिक स्वरूपाचे कार्य राबविण्यात आणि पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पॅन इंडियाच्या विविध भागात पोहोचण्यासाठी मदतीचा हात दिला.
फाउंडेशनने पुण्यातील स्थानिक स्वयंसेवी संस्था सहेली संघाशी संलग्न असलेल्या 71 सेक्स कामगारांना किराणा किट देऊन आधार दिला.
प्राथमिक धान्य वाटपासाठी एमएमएफ आणि एफआयएलने टीच फॉर इंडिया, आकांक्षा, आयटॅक आणि एफआयसीसीआय मुख्य कार्यालयाला पाठिंबा दिला.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील महिला आणि शालेय मुलींना मासिक पाळी सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सॅनिटरी टॉवेल्सही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
2010 पासून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात एमएमएफ अथक प्रयत्न करत असलेल्या सेरेब्रल पाल्सी (सीपी) हा अतिशय जिव्हाल्याचा प्रकल्प आहे. याची सुरूवात व्हील चेअर्स, कमोड्स आणि डेस्कच्या देणगीने झाली. या प्रकल्पाला जसा वेग आला आणि आमच्या टीमने येथील ठिकाणांना भेट देण्यास सुरवात केली, तेव्हा हे लक्षात आले की ही मुले या अपंगत्वातून बरे होण्यासाठी आवश्यक थेरपी सेवा प्राप्त करीत नाहीत. वास्तविक, जिल्ह्यात सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची अवस्था अधिकच खालावली.
2016 च्या सुरुवातीस, या रूग्णांना मदत करण्यासाठी एमएमएफने स्थानिक खासगी दवाखाने चालविणारे फिजिओथेरपिस्ट आणि मोबाइल शिक्षकांशी चर्चा सुरू केली, त्यातून पुनर्वसन केंद्र सुरू करण्यासाठी आमचे डोळे उघडले. एफआयएल/ एमएमएफच्या मिशन सीपीने फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि व्यावसायिक थेरपी प्रदान करण्यासाठी वाई, त्यानंतर सातारा, पाटण, पाचगणी, रत्नागिरी आणि चिपळूण येथे प्रथम सुरुवात केली.
एमएमएफने न्यूरो सर्जन, ऑर्थोपेडिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑर्थोटिस्ट्स आणि ऑप्टोमेट्रिस्ट यांचा समावेश असलेल्या पुण्यातील नामांकित रुग्णालयांमधील संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर आणि एचव्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या तज्ञांच्या टीमने शिबिरांचे आयोजन करून सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांची तपासणी केली. विशेष म्हणजे ही सर्व रुग्णालये प्रथमच एकाच प्रकल्पांसाठी एकत्र आले. आतापर्यंत 15 मूल्यांकन शिबिरे पूर्ण झाली असून 986 मुले सीपीसाठी नोंदविण्यात आली आहेत.
एप्रिल 2019 या सीपी मिशनच्या 4थ्या वर्षी फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी येथील पुनर्वसन केंद्राची सुरूवात झाली. त्यांनी फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट नियुक्त केले आहेत जे दररोज त्यांच्या सेवा प्रदान करतात.
फाउंडेशनला सातारा आणि रत्नागिरी येथील अधिका-यांकडून मिळालेला पाठिंबा उल्लेखनीय आहे. आरबीएसके (राष्ट्रीय बाल शिक्षण केंद्र) च्या माध्यमातून रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर केलेली तरतूद, शिबिराच्या दरम्यान स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्थानिक सिव्हिल सर्जन उपलब्ध करुन देणे याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे.
दृढ निश्चय आणि दृष्टी यामुळे रत्नागिरी, सातारा, पुणे येथील एमएमएफ संघांना या लॉकडाऊनच्या वेळी या मुलांना आधार देण्यात मदत झाली आहे.
एफआयएल / एमएमएफने ऑनलाइन थेरपीची सुरूवात केली आणि स्काईप आणि व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉलद्वारे एमएमएफच्या टीमने थेरपिस्टच्या उत्तम सहकार्याद्वारे रुग्णांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्येक पालकांना थेट सत्राद्वारे फोनवर स्वतंत्र वेळ मिळतो.
लॉकडाउनच्या 3 महिन्यांत आमच्याकडे सातारा, वाई, पाचगणी-महाबळेश्वर, पाटण आणि रत्नागिरी येथून दररोज थेरपी घेतल्या जाणा-या 103 मुलांची नावे दाखल झाली आहेत.
सर्व शिक्षा अभियान (GoM) च्या विशेष शिक्षकांच्या नेटवर्कने आम्हाला प्रथमच नोंदणी झालेल्या अनेक सीपी मुलांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. आम्ही ,रत्नागिरी आणि सातारा येथील अधिका-यांना या मोहिमेमध्ये पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.
सीपी रुग्णांना समाजात समाविष्ट करण्यासाठी एमएमएफ प्रयत्नशील आहे जेणेकरून ते आणि त्यांची काळजी घेणारे लोक या विचित्र परिस्थितीत असतानाही त्यांना सर्वोत्तम जीवन जगता येईल.
या उपक्रमाविषयी बोलताना मुकुल माधव फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “लॉकडाऊनच्या वेळी फाउंडेशनकडून त्याच्या लाभार्थ्यांना संपूर्ण मनाने पाठबळ दिले जात आहे. वृद्ध वयातील लोक असोत, असुरक्षित महिला, मोबाइल शिक्षक, वा अधिकारी, पालक किंवा सिस्टम असोत; या सर्व कार्यात आणि उपक्रम राबविण्यात या सर्वांचा मोलाचा वाटा होता.
आपण कोविड -19 विरुद्धचा हा लढ़ा एकत्रित लढू. घरी रहा! सुरक्षित राहा