गरीब व गरजू शेतकऱ्यांना गाव विकास समिती मार्फत मोफत बियाणे वाटप

दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन दिले बियाणे

देवरुख:-गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या संगमेश्वर तालुका विभागाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचे औचित्य साधून गरीब व गरजू शेतकऱ्यांना मोफत भात बियान्याचे वाटप करण्यात आले.
गाव विकास समितीच्या पदाधिकारी यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून गरजू शेतकऱ्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन हे बियाणे देण्यात आले.दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना भाताच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवने,करंबेले तर्फे देवळे,कनकाडी घडशी वाडी,काटवली,उक्षी, साडवली,निवे,हरपुडे,कांगणे वाडी, धामनसे-जाकादेवी या गावांतील गरजू शेतकऱ्यांना गाव विकास समितीच्या माध्यमातून भात बियाणे देण्यात आले. यावर्षीही गाव विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे एक-काडी भात बियाणे देण्यात आले. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे, कृषी तज्ञ राहुल यादव,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर,महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे,उपाध्यक्ष अनघा कांगणे,जिल्हा संघटक मनोज घुग,जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी,तालुका कार्याध्यक्ष अमित गमरे,डॉ मंगेश कांगणे,तालुका अध्यक्ष प्रशांत यादव,संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष प्रशांत घुग,विशाल धुमक, महेश धावडे,व गाव विकास समितीच्या इतर पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन या बियाण्यांचे वाटप केले.